
उत्तराखंडमध्ये महिला किंवा पुरुषाने दिव्यांग व्यक्तीसोबत विवाह केल्यास त्या व्यक्तीला 50 हजार रुपये देण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. याआधी 25 हजार रुपये दिले जात होते, परंतु आता यात दुप्पट वाढ केली आहे. पती किंवा पत्नी या दोघांपैकी एक जण दिव्यांग असायला हवा. या दोघांपैकी जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.