प्रयत्न करत रहा! यश तुमचे आहे, आता प्रत्येक जण होईल यशस्वी

प्रातिनिधिक फोटो

>>वैशाली गव्हाणकर, संचालिका – ग्यानमुद्रा एज्युकेशन

मोठ्या यशाची स्वप्नं तर आपल्यातला प्रत्येक जण बघतो. पण त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची धमक फार थोड्याच लोकांमध्ये असते. असं नाही की आपल्यात क्षमता नसतात. पण त्या योग्य पद्धतीने कशा वापरायच्या याची आपल्याला कल्पना नसते. मग आपण आपला ‘सेफ झोन’ सोडण्यास घाबरतो आणि टाळाटाळ करायला सुरुवात करतो. अडचणी तर काय सगळ्यांच्याच आयुष्यात असतात. पण आपल्यातले बरेच जण अडचणींना संकट समजून प्रयत्न करणंच सोडून देतात. स्वतःला अपयशी समजून हार मानतात. तुम्हीही त्यांच्या पैकीच एक नाही ना? तपासून नक्की पहा…

प्रयत्न करत राहणे महत्वाचे- यशस्वी होणं थोडंफार अवघड असलं तरी देखील अशक्य मात्र नक्कीच नाही. गरज असते ती फक्त आपल्यातली क्षमता ओळखून स्वतःत आत्मविश्वास निर्माण करण्याची. मुळात प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. खरं सांगायचं तर, यश म्हणजे नेमकं काय? हे आधी प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं. जीवनात आपण ठरवलेले ध्येय पूर्ण करणे म्हणजेच यश मिळवणे. आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना नेहमीच अपेक्षित यश मिळेलच असे नाही, काही वेळा आपण अपयशीही ठरतो. म्हणून हार मानणं कितपत योग्य आहे. जर प्रयत्नात सातत्य नसेल, वेळेचे नियोजन केले नसेल तर त्याला यश मिळणार नाही हे नक्की. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करणं सोडून चालणार नाही.

स्वतःतील नकरात्मक विचारांना मोकळे करा – आपल्यातली कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा. मनात फक्त सकारात्मक विचारांनाच थारा द्या. मग पहा तुम्हाला हमखास यश मिळेल. अपयशानंतरही तुमच्यातला आत्मविश्वास कायम असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपल्यातली कमतरता ओळखून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा. मनात फक्त सकारात्मक विचारांनाच थारा द्या. मग पहा तुम्हाला हमखास यश मिळेल. स्वतःच्या कमतरतांबरोबर आपल्यातल्या चांगल्या गुणांचे सतत स्मरण ठेवा. तरच तुमच्या आत्मविश्वासात भर पडेल.

यश मिळवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो, त्याची यादी बरीच मोठी आहे. पण पुढच्या 10 गोष्टींपासून तुम्ही नक्कीच सुरुवात करु शकता.

1. सर्वात आधी तुमचे ध्येय निश्चित करा. ध्येयपूर्तीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करा.

2. आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी काय अडचणी येवू शकतात याची एक यादी करा आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न करा.

3. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.

4. स्वतःच्या क्षमता ओळखा.

5. वेळेचे नियोजन करा आणि काटेकोरपणे ते पाळा

6. अवांतर वाचनाला सुरुवात करा.

7. कोणत्याही अपयशाची कारण सांगू नका, तर आत्मपरीक्षण करा आणि आपल्या कमतरतांवर मात करा.

8. नियमितपणे योगासनं- व्यायाम करा.

9. आव्हाने (Risk) घ्यायला शिका.

10. सतत सकारात्मक विचार करा.

एकदा का तुम्ही या गोष्टी प्रत्यक्षात अमलात अंमलात आणल्यात की यश तुमचेच आहे.

आपली प्रतिक्रिया द्या