ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

55

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी तसेच इंग्रजी रंगभूमी आणि चित्रपटांत आपल्या अभिनयाने आणि विनोदाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं आज निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.

किशोर यांच्या मातोश्री मालतीबाई प्रधान या नाटक प्रेमी असल्याने त्यांना नाटकाची गोडी निर्माण झाली. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी विविध एकांकिकांमधून आपली अभिनय कला दाखवली. पुढे मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमध्ये त्यांनी काम केलं.

डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटातील खट्याळ आजोबा, ‘जब वुई मेट’मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. तसंच दूरदर्शन वाहिनीवरील गजरा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभासोबत सादर केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या