गझलसम्राट पंकज उधास अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध गझलगायक पंकज उधास आज अनंतात विलीन झाले. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘गझलसम्राट’ला अलविदा करताना साऱयांनाच अश्रू अनावर झाले.

पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने सोमवारी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर आणि बॉलीवूडवर शोककळा पसरली. अनेक दिग्गजांनी आज त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. गायक शंकर महादेवन, झाकीर हुसैन, अनुप जलोटा, हरिहरन, फजल कुरेशी, तौफिक कुरेशी, आनंदजी, विशाल भारद्वाज, रेखा भारद्वाज, सोनू निगम, सलीम- सुलेमान, पॅपोन आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पत्नी फरीदा, कन्या नायाब आणि रेका तसेच मोठे बंधू मनहर आणि निर्मल यांनी उधास यांना साश्रू नयनांशी निरोप दिला.