सुरांचा राजा काळाच्या पडद्याआड, एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

तामीळ, तेलगु आणि हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या सुमधुर आवाजाची जादू पसरवणारे प्रख्यात  गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी चेन्नई येथील एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बालसुब्रमण्यम यांच्या सुरांनी 90 च्या दशकाला अक्षरशः मंत्रमुग्ध केले. जणू एसपी युग अवतरलं. अशा विक्रमादित्य, प्रतिभावंत गायकाचे सूर आज अबोल झाले. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  

सुरांच्या दुनियेतील मनस्वी लिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्की अवलिया होते, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली. या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त्यांच्या आवाजाची जादू मागे राहील, ते त्या अर्थाने अजरामर आहेत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या