
आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांसाठी जगभरात ओळखली जाणारी विको लॅबोरेटरीज कंपनी आता ‘हल्दी है तो हेल्दी है’ ही मोहीम राबवणार आहे. त्यासाठी अभिनेत्री रविना टंडन आणि नवोदित तारका सुहानी सेठी यांची निवड करण्यात आली आहे. परंपरा आणि सौंदर्य यांच्यातील अंतर कमी करणारी ही नवीन मोहीम आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठत व्यक्तिमत्त्व असलेल्या रविना टंडन यांना विकोने आपल्या स्किनकेअरच्या पोर्टफोलिओसाठी ऑनबोर्ड केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कालातीत अपील विको या ब्रँडचा ठळकपणा आणि आकर्षण वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. सुहानी सेठी उत्साही आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असून तिचे व्यक्तिमत्त्व किशोरवयीन, तरुणांना प्रभावीत करते. या दोघींची उत्तम केमिस्ट्री समाजाचा विको या ब्रँडवरचा विश्वास आणि विकोची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवेल, असे विको कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.



























































