Video- अजिंक्य रहाणेच्या लेकीशी बोबड्या भाषेत गप्पा, नेटकरी म्हणतात ‘so cute’

1447

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे नुकताच ‘बाबा’ झाला. 5 ऑक्टोबर रोजी अजिंक्य आणि त्याची पत्नी राधिका यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. आपल्या या लाडक्या लेकीचं नाव आर्या असं ठेवलं आहे. पितृत्वाची नवीन जबाबदारी अजिंक्य मोठ्या आनंदात सांभाळत आहे. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरून त्याचा प्रत्यय येताना दिसत आहे.

अजिंक्य रहाणेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत अजिंक्य त्याच्या लेकीशी बोबड्या भाषेत गप्पा मारताना दिसत आहे. छोट्याश्या आर्याच्या मंकी काका नावाच्या दोस्ताविषयी अजिंक्य तिला विचारत आहे. अवघ्या दोन महिन्यांची असलेली आर्या आपल्या बाबांच्या प्रश्नांना तिच्या नुसत्या आवाजांच्या भाषेत उत्तर देत आहे. बाप लेकीच्या या गोड संभाषणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर सो क्यूट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा हा गोड व्हिडीओ-


View this post on Instagram

Very important discussion with Aarya about her friend

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

आपली प्रतिक्रिया द्या