लीला गांधी, भालचंद्र कुलकर्णी, विक्रम गोखले, सुषमा शिरोमणी ‘चित्रभूषण’ पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

चित्रपट क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱया मान्यकरांना देण्यात येणाऱया ‘चित्रभूषण’ पुरस्काराची घोषणा आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळार्फे करण्यात आली. यंदाचा ‘चित्रभूषण’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, भालचंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सुषमा शिरोमणी तसेच ज्येष्ठ कलादिग्दर्शक श्रीकांत धोंगडे, निर्माते किशोर मिस्कीन यांना जाहीर झाला आहे. 51 हजार रुपये, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुरस्कारांची घोषणा केली. ‘चित्रकर्मी’ पुरस्कार रमेश साळगाककर, संजीक नाईक, किलास उजकणे, आप्पा कढाककर, नरेंद्र पंडीत, प्रशांत पाताडे, दीपक किरकूड, विलास रानडे, विनय मांडके, जयवंत राऊत, सतीश पुळेकर, प्रेमाकिरण, सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर, वसंत इंगळे यांना जाहीर झाला आहे. 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी महामंडळाच्या संचालिका चैत्राली डोंगरे, संचालिका वर्षा उसगाककर, प्रमुख कार्यवाहक सुशांत शेलार, सहकार्यकाहक विजय खोचीकर, संचालक सतीश रणदिवे उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळा 19 ऑगस्ट रोजी रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी येथे सायंकाळी 6 वाजता होईल.