पडेगावात नागरिकांचा रस्त्यावर ठिय्या, कचऱ्याची वाहने अडवली.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

संभाजीनगर मधील पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास विरोध करत सलग दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर ठिय्या आंदोलन करुन नागरिकांनी कचऱ्याची वाहने अडवली.

महापालिका दोन दिवसांपासून शहरातील कचरा पडेगाव परिसरातील प्रक्रिया केंद्रावर टाकत आहे. मात्र कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने नागरिकांनी मंगळवारी वाहनांवर दगडफेक करून विरोध दर्शविला होता. मात्र, नंतर पोलिस बंदोबस्तात दिवसभरात जवळपास पन्नास ट्रक कचरा येथे टाकण्यात आला. त्यानंतर बुधवारी देखील नागरिक आक्रमक होत त्यांनी सकाळपासूनच कचऱ्याची वाहने अडवली आहेत. सध्या पडेगाव येथे परिसरातील नागरिक रस्त्यावर ठिय्या देऊन बसले असून, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र अध्या तिढा सुटला नही.