
सामना ऑनलाईन, श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधल्या श्रीनगरच्या तुरुंगात कैद्यांनी हिंसाचार सुरू केला आहे. गुरुवार संध्याकाळपासून या हिंसाचाराला सुरूवात झाल्याचं सांगण्यात येत आहे. कैद्यांच्या बराकीमध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. कैद्यांनी या दुरुस्तीला विरोध करत हा हिंसाचार सुरू केला आहे. या कैद्यांनी तुरुंगात जाळपोळ केल्याचंही वृत्त आहे. दुरुस्तीच्या कामासाठी तुरुंगातील कैद्यांना राज्याबाहेर हलवण्यात येणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. यामुळे कैदी घाबरले असून या भीतीपोटीच त्यांनी हा हिंसाचार सुरू केला असल्याचं कळतंय. तुरुंगामध्ये सिलिंडर पेटवून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले होते. या तुरुंगामध्ये 480 कैदी असून, हिंसाचारात कोणी जखमी झालंय अथना नाही हे कळू शकलेले नाही.



























































