साडी नेसून केले जबरदस्त स्टंट, नृत्यांगना रुक्मिणी विजयकुमार यांचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवेगळे स्टंट, तेही साडी नेसून….ऐकून जरा आश्चर्य वाटतं ना… प्रसिद्ध नृत्यांगना रुक्मिणी विजयकुमार यांनी चक्क साडी नेसून केलेल्या स्टंटचा व्हिडीयो असाच थक्क करणारा आहे. रुक्मिणी यांनी स्वतः हा व्हिडीयो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्या स्प्लिट्स, हॅण्डस्टँड, बॅकफ्लिप असे स्टंट करताना दिसत आहेत. कम्फर्ट कपडय़ांमध्ये देखील असे स्टंट करणे अवघड असतं, ते त्यांनी साडी नेसून केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

स्टंटचा व्हिडीयो शेअर करताना रुक्मिणी यांनी लिहिलंय, या गोष्टी आपण साडी नेसूनही करू शकतो. गेल्यावर्षी मी जागतिक योग दिनी जो व्हिडीयो पोस्ट केला होता. त्यामागची ही दृश्ये आहेत. रुक्मिणी यांच्या व्हिडीयोला साडेसहा लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.