
विराट कोहली हा कसोटी, वन डे आणि टी-20 या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सर्वोत्तम फलंदाज आले. नेतृत्वातही त्याने अनेक वर्षे उत्तम कामगिरी केली, पण त्याचा कसोटी कारकिर्दीचा आरंभाचा काळ मात्र संघर्षमय होता. निवड समितीला 2012 मध्ये पर्थमध्ये विराट कोहलीऐवजी रोहित शर्माला खेळवायचे होते. मी उपकर्णधार होतो आणि महेंद्रसिंह धोनी संघाचे नेतृत्व करत होता. आम्ही ठरवले, की विराटला पाठिंबा द्यायचा. आमच्या त्या निर्णयाने विराटची कारकीर्द पुन्हा बहरली, असा मोठा खुलासा टीम इंडियाचे धडाकेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी केली आहे.
विराट कोहलीने अखेरीस त्या वर्षीच्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या घरच्या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. त्याने ऑस्ट्रेलियाचाही दौरा केला. तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता, परंतु तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि उपकर्णजधार वीरेंद्र सेहवाग यांच्यामुळे विराटला संघातून डच्चू मिळाला नाही.
इथूनच बहरले ‘विराट युग’
धोनी आणि सेहवागचा हा निर्णय विराटच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा निर्णय ठरला. तेव्हापासून त्याला एकदाही संघातून वगळण्यात आलेले नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 44 धावा केल्या आणि त्यानंतर 75 धावा केल्या. हिंदुस्थानने हा सामना एक डाव आणि 37 धावांनी गमावला. विराटने चौथ्या कसोटीत शतक झळकावले आणि कसोटी मालिकेत तिहेरी आकडा गाठणारा तो एकमेव हिंदुस्थानी फलंदाज ठरला होता. तिरंगी मालिकेत त्याने आपला फॉर्म कायम ठेवला आणि 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढच्या वेळी विराटने कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.



























































