गोलंदाजी सुधारा नाहीतर धोनीवर बंदी, वीरेंद्र सेहवागने दिला चेन्नईच्या गोलंदाजांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी वाइड आणि नो बॉल टाकणं बंद नाही केलं तर कर्णधार महेंद्र सिंह धोनीला बंदीला सामोरे जावे लागेल. हे टाळायचं असेल तर गोलंदाजांनी स्वताच्या गोलंदाजीत सुधारणा करा अन्यथा तुम्हाला पुढच्या सामन्यांना कर्णधाराशिवाय उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने.

चेन्नईच्या गोलंदाजीवर सेहवागने खूपच नाराजी व्यक्त केली. गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी टाकण्याऐवजी स्वैरच मारा अधिक केला आहे. बंगळुरूविरुद्ध सहा चेंडू वाइड टाकले. हा सामना चेन्नई जिंकला असला तरी धोनीच्या चेहर्‍यावर समाधान नव्हते. त्याने मागच्या सामन्यातही आपल्या गोलंदाजांनी तंबी दिली होती की स्टम्पवर गोलंदाजी टाका नाहीतर मी जातो. तरीही चेन्नईच्या गोलंदाजीत सुधारणा झालेली नाही. चेन्नईने बंगळुरूविरुद्ध 11, लखनौविरुद्ध 18 अवांतर धावा दिल्या होत्या. पुढच्या सामन्यांमध्ये चेन्नईच्या गोलंदाजांना वाइड-नो बॉलवर नियंत्रण मिळविता आले नाही तर हे धोनीसाठी फार घातक असेल. त्याला दंड म्हणून एका सामन्याची बंदी भोगावी लागू शकते.

सेहवाग तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर खूपच चिडला. सर्वाधिक वाइड फेकण्यात तोच सर्वात पुढे आहे. मात्र फिरकीवीर महेश तीक्षणाचे वाइड पाहून सेहवागही चिडला आहे. एक फिरकीवीर इतके वाइड टाकतो, हे पाहून फार निराशा झाली. तो आपल्या वाइड चेंडूंवर नियंत्रण मिळवू शकतो, असेही सेहवाग म्हणाला.