
शेअर बाजारातील गुंतवणुकीवर तिपटीने परताव्याचे आमिष दाखवून बार्शीकरांना गंडविणाऱ्या विशाल फटेने सोमवारी सोशल मिडीयावर आपली बाजू मांडली आहे. आपला कोणालाही फसवण्याचा हेतू नव्हता. तसेच आपण कोणालाही फसवणार नसल्याचे सांगत आपण सगळे पैसे परत करणार असल्याचे सांगितले. आपण फरार नसून आज संध्यकाळपर्यंत पोलिसांसमोर हजर होणार आहोत. याप्रकरणी आपल्यावर जी कारवाई होईल, त्यास समोरे जाण्याची तयारी असल्याचेही त्याने सांगितले.
बार्शीतील विशाल फटेविरुद्ध दररोज तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे सोमवारी विशालने सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकून आपली बाजू मांडली आहे. तसेच आपण आज पोलिसांसमोर हडर होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. आपल्या या व्यवसायाशी आपल्या कुटुंबियांचा काहीही संबंध नसताना त्यांना यात अडकवण्यात आल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी याप्रकरणी विशाल फटेचे वडील अंबादास फटे व भाऊ वैभव फटे या दोघांना अटक करण्यात आली. मात्र, विशाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याने आजा पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे सांगितले आहे.
माझ्या अकाऊंटमध्ये काही कोटी रुपये आहेत. त्यामुळे आपली फसवणुकीची योजना असून पळून जाण्याच्या तयारीत होतो, या आरोपांमध्ये अर्थ नाही. बँक खात्यात एवढे पैसे ठेवत कोणी कशासाठी पळून जाईल. कोणाचेही पैसे बुडवण्याचा हेतू नव्हता किंवा नाही. तसेच 200 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप होत आहे, हा आकडा कोणी आणि कसा शोधला. कितीही आकडे जुळवले तरी मुद्दल 10 ते 15 कोटींच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे आपल्यावर विनाकारण चिखलफेक होत असल्याचे त्याने सांगितले. आपल्याकडून व्यवहारात काही चुका झाल्या. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी आपण आठवडाभर प्रयत्न करत होतो. मात्र, आपल्यावर चिखलफेक असून कुटुंबियांना विनाकारण त्रास होत आहे. त्यामुळए आज पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे त्याने सांगितले.
आपण पैसे जमवण्याच्या प्रयत्नात होतो. त्याचवेळी आपल्यावर केसेस दाखल करण्यात आल्या. त्यात अनेक वर्षांपासून आपल्यासोबत असणारे लोक आहेत. त्यांनीही वाट बघितली नाही. आपण पोलभने दाखवून पैसे जमवल्याचा आरोप होत आहे. आपण कोणतेही प्रलोभन दाखवले नाही किंवा कोणताही कमीशन एंजट नेमला नव्हता. काही चुका झाल्या. त्या मान्य असून आपल्याला जी शिक्षा होईल, ती भोगायला तयार आहे.
आपल्या कुटुंबियांचा आपल्या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. आपल्याला पळून जायचे असते तर मला कसेही शक्य होते. 30 ते 40 लाखात मी देश सोडून पळून गेलो असतो. मात्र, आपला तसा कोणताही हेतू नव्हता किंवा नाही. आपण लोकांसमोरच ट्रेडिंग करायचो. अनेक डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होते. त्यांच्यासमोर मी व्यवहार करायचो. ते त्यांना समजत नव्हते काय, असा सवालही त्याने केला.
आपण कोणतेही प्रलोभन दाखवले नाही. ज्याला मार्केटचा अनुभव आहे, त्यांना हे आकडे समजतात.एवढा फायदा कसा होतो, ते मार्केटचा अनुभव असलेले कोणीही सांगेल. मात्र, ज्या काही चुका झाल्या, त्याचे दोष आपलाच आहे. आपण 28 टक्के किंवा इतर कोणेतही प्रलोभन दाखवलेले नाही. कोणतीही शहानिशा न करता, आरोप करण्यात आले. पोलिसांनी आपल्या खात्याचे डिटेल्स तपासावे. आपण कोणालाही फसवलेले नाही. सगळ्याचे पैसे दिले. कोरोना काळात कर्ज काढूनही लोकांचे पैसे दिले आहेत. तरीही लोकांनी मी पळून गेलो असा विचार लोकांनी कसा केला. आपण कसेही करून लोकांचे पैसे फेडणार आहोत. ज्या गोष्टी झाल्या त्या जाणूनबुजून केल्या नाहीत. लोकांनी विनाकारण आपल्यावर चिखलफेक केली.
आपण अनेकांचे पैसे न घेता त्यांना परत पाठवले. अनेकांचे पैसे आपण घेतले नाही. पैसे जमवूनच पळून जायचे असते, तर मी प्रत्येकाचे पैसे घेतले असते. लोकांनी केलेल्या केसेस मान्य आहेत. आपण पोलिसांसमोर हजर होणार आहोत. आपल्यावर जी कारवाई होईल, त्यासाठी तयार आहोत. आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही. आपल्या चुका झाल्यात. त्याला आपणच जबाबदार आहोत. ज्यांना आपल्यावर विश्वास आहे. त्यांनी थांबावे, त्यांना पैसे परत करणार आहे. ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी केसेस कराव्या. आपण शिक्षा भागायला तयार आहे. आपल्या कुटुंबियांचा याच्याशी काहीही संबंध नाही.
































































