
CUET UG परीक्षेतील तांत्रिक बिघाड आणि गोंधळावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला टोला लगावला. ते स्वतःला विश्वगुरू म्हणवतात पण देशात एकही परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-यूजी (CUET-UG) २०२६ परीक्षेला झालेल्या विलंबामुळे देशभरातील अनेक केंद्रांवर गोंधळ झाला. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नंतर तांत्रिक बिघाडाचे कारण दिले आणि परीक्षा उशिरा सुरू झाली. यामुळे राजकीय वादाला तोंड फुटले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, “NEET, CBSE, SSC, आणि आज CUET. चार परीक्षा, एक कोटी विद्यार्थी, एकही परीक्षा प्रामाणिकपणे घेतली गेली नाही.”
राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले, ” ते विशअवगुरू असल्याचा दावा करतात, पण देशात एकही परीक्षा घेऊ शकत नाही – मोदीजींनी संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ज्या पिढीचे भविष्य तुम्ही उद्ध्वस्त करत आहात, ती पिढीच तुम्हाला धडा शिकवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
NEET। CBSE। SSC। और आज CUET।
चार परीक्षाएँ। एक करोड़ बच्चे। एक भी ईमानदारी से नहीं हो पाई।
दावे “विश्वगुरु” के, मगर देश में एक परीक्षा नहीं करवा सकते – मोदी जी ने पूरी शिक्षा व्यवस्था तबाह कर दी है।
जिस पीढ़ी का भविष्य आप बर्बाद कर रहे हैं – वही पीढ़ी आपका हिसाब करेगी।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2026
CUET-UG 2026 परीक्षेदरम्यान, अनेक केंद्रांवर तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे परीक्षा नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाली. NTA ने सांगितले की तांत्रिक समस्या सोडवण्यात आली आहे आणि कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेचा पूर्ण वेळ देण्यात आला. NEET, CBSE आणि SSC शी संबंधित अलीकडील वादांनंतर, CUET ला झालेल्या विलंबामुळे परीक्षा पद्धतीबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विरोधी पक्ष सरकार आणि शिक्षण मंत्रालयाकडून उत्तरांची मागणी करत आहेत, तर NTA चे म्हणणे आहे की परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.
NTA ने सांगितले की सकाळच्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता आणि कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान झाले नाही. एजन्सीने विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागितली. विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येमुळे CUET-UG परीक्षा अनेक दिवस आणि अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते, आणि विविध विषयांच्या संयोजनामुळे परीक्षेचे वेळापत्रक विस्तृत असते. यावर्षी CUET-UG २०२६ परीक्षा ११ मे पासून सुरू झाली असून ती ३१ मे पर्यंत चालणार आहे.




























































