
आयडियल स्पोर्ट्स अॅपॅडमी, शिवनेर व आयडियल ग्रुप आयोजित शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे स्मृती आंतर हॉस्पिटल टी-20 क्रिकेट स्पर्धेत जसलोक हॉस्पिटल विरुद्ध हिरानंदानी हॉस्पिटल आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटल विरुद्ध ग्लोबल हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये 16 नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्क मैदानात चुरशीचे सामने होतील. चारही संघांमध्ये उदयोन्मुख खेळाडूंचा भरणा असल्यामुळे दोन्ही लढतींमधील विजयाचे पारडे दोलायमान राहील.
जसलोक हॉस्पिटल क्रिकेट संघामधील कप्तान प्रवीण मोरजकर, श्रीकांत दुधवडकर, सचिन तोडणकर, नितीन सोळंकी, सचिन दुधवडकर, दीपक रत्नापूर, पवन माहीमकर, रोहित जाधव, सुमित महागावकर, प्रसाद पाटील, भूषण कदम आदी खेळाडूंची जोरदार लढत प्रतिस्पर्धी हिरानंदानी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कर्णधार रूपेंद्र माने, तुषार राणे, यष्टीरक्षक शंकर पंडीधर, निखिल काळे, प्रशांत देसाई, तृशाल गिरमकर, सचिन पुडतरकर, सोनू पिल्लै, दिनेश सोळंकी, सुनील पांडे, दुर्गाप्रताप जैस्वार आदी खेळाडूंमध्ये होईल.






























































