वडाळ्यातील कचरा वर्गीकरण प्रकल्पामुळे नागरिक हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘एफ’ उत्तर विभागातील वडाळय़ात खुल्या भूखंडावर सुरू असलेल्या कचरा वर्गीकरण प्रकल्पामुळे परिसरातील रहिवाशांना प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेने हैराण केले आहे. या पार्श्वभूमीवर केलेल्या तक्रारींची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या ठिकाणी देऊन पाहणी केली.

कडाळय़ातील इफजी इमारती जवळ असलेल्या खुल्या भूखंडाकर कचऱयाचे वर्गीकरण करत असल्यामुळे ज्येष्ठांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी पाहणी करून या ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम करून घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष सचिन पडकळ, नगरसेकिका तृष्णा विश्वासराव, नगरसेकक अमेय घोले, सहायक आयुक्त केशव उबाळे उपस्थित होते.