पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ‘वॉक फॉर मॅनग्रोव्ह’; आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आता तरुणाई सरसावली असून ‘वॉक फॉर मॅनग्रोव्ह’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘भामला’ फाऊंडेशनने पालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू केला आहे. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज या उपक्रमाचा शुभारंभ वांद्रे कार्टर रोड येथे करण्यात आला.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांशी संकल्पनेतून राज्यात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलनासाठी काम करणाऱ्या ‘भामला’ फाऊंडेशनच्या माध्यमातून ‘वॉक फॉर मॅनग्रोव्ह’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात मॅनग्रोव्हमध्ये अडकलेले प्लॅस्टिक, कपडे आणि कचरा साफ करण्यात आल्याचे नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी अभिनेत्री ईशा गुप्ता, पालिका अधिकारी उघाडे यांच्यासह विविध कॉलेजचे विद्यार्थी, तरुण-तरुणी सहभागी झाले होते. ‘भामला’ फाऊंडेशनच्या माध्यमातून मॅनग्रोव्हची स्वच्छता, बीच क्लिनिंग असे उपक्रम राबविण्यात येत आहेत.