
सामना ऑनलाईन, मुंबई
दिवसभर पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे मुंबईत भिंत कोसळल्याच्या घटना घडल्या. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाशेजारी लागून असलेल्या भिंतीचा भाग सततच्या पावसाच्या मार्याने खचून कोसळला. या भिंतीखाली तीन मालवाहू गाड्या सापडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. अंधेरी पूर्वेकडील सहार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई महापालिकेच्या आपतकालीन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, शहरात ५, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १३ अशा एकूण २३ ठिकाणी घराचा भाग आणि भिंत कोसळल्याच्या तक्रारी आल्या. या घटनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही.

























































