अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ‘वॉलमार्ट’ने उचलले महत्त्वाचे पाऊल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या महामारीतून देशाला सावरण्याच्या प्रक्रियेत अल्पभूधारक शेतकऱयांचे असलेले योगदान लक्षात घेत वॉलमार्ट फाऊंडेशनने आज दोन नक्या घोषणा केल्या आहेत. शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी वॉ लमार्ट 4.5 दशलक्ष डॉलर्सचा निधी तानागर आणि प्रदान या दोन ना-नफा तत्वावरील संस्थांना देण्यात येणार आहे.

वॉलमार्टने सप्टेंबर 2018 मध्ये त्यांनी जाहीर केलेल्या 25 दशलक्ष डॉलर्सच्या अनुदानाचा भाग म्हणून ही घोषणा केली आहे. तानागर आणि प्रदान या दोन्ही संस्था फार्मर प्रोडय़ुसर ऑर्गनायझेशन्सच्या (एफपीओ) माध्यमातून महिला शेतकऱयांसाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासह वॉलमार्ट फाऊंडेशनने आतापर्यंत देशातील आठ बिगर-सरकारी संस्थांच्या माध्यमातून एकूण 15 दशलक्ष डॉलर्सची गुंतकणूक केली आहे. यातून आजवर 80,000 महिला शेतकऱयांसह दीड लाख शेतकऱयांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम साधण्यासाठीच्या उपक्रमांना मदत केली आहे.

याबाबत वॉलमार्ट फाऊंडेशनच्या अध्यक्ष कॅथलीन मॅकलॉगलिन म्हणाल्या, ‘कोविड 19 संकटाने देशातील शेतकऱयांवर अधिक ताण आला आहे. विशेषतः उत्पन्न खालावल्याने महिला शेतकऱयांवर घर चालकवण्याची अधिकच जबाबदारी आली आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या चांगल्या भविष्यासाठी हा उपक्रम आहे.’