
सामना प्रतिनिधी | अलिबाग
पिलरला तडे, ठिकठिकाणी पडलेल्या चिरा, इतकेच नव्हे तर निखळलेल्या लोखंडी सळया, अशी जर्जर अवस्था पाली-जांभूळपाडा पुलाची झाली आहे. काकण-पाली-खोपोली महामार्गावरील वाहतुकीसाठी महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. सावित्री नदी पूल दुर्घटनेनंतरही धोकादायक पुलांबाबत सरकारी यंत्रणा सुस्त असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या वर्षी या पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यानंतरही या पुलाच्या दुरुस्तीसाठी दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात येथे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काकण-पाली-खोपोली महामार्गाकरील पाली क जांभूळपाडा येथील महत्त्वाचा समजला जाणारा हा पूल 1950 साली बांधण्यात आला होता. दिवस रात्र अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या 69 वर्षे जुन्या पुलाची अवस्था आता बिकट झाली आहे. कर्षापूर्कीच्या फेबुवारी महिन्यात या पुलाचे संरक्षक कठडे तुटून मोटार नदीत कोसळली होती. या घटनेत एका महिलेला जीवही गमवावा लागला. मात्र त्यानंतरही या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच होत आहे. सध्या हा पूल धोकादायक स्थितीत असून अवजड वाहन पुलावरून गेल्यास हादरे बसत असल्याचा वाहनचालकांचा अनुभव आहे. पुलाची वेळीच दुरुस्ती केली नाहीतर साकित्री दुर्घटनेची पुनराकृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्षमतेपेक्षा तिप्पट वाहतूक
पाली-वाकण मार्गावर असलेल्या तिन्ही पुलांची अवस्था गंभीर झाली आहे. या मार्गावरून रोज शेकडो अवजड वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ असते. त्यातच पुलांची स्थिती कमकुवत झाली असून वाहने पेलण्याची क्षमता संपली आहे, असे असतानाही या पुलांवरून क्षमतेपेक्षा तिप्पट वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे.


























































