वासीम जाफर ठरणार ‘रणजी’त 150 लढती खेळणारा पहिला खेळाडू

417

मूळचा मुंबईकर, पण आता विदर्भ संघासाठी रणजी क्रिकेट खेळणारा वासीम जाफर यंदाच्या रणजी हंगामात अनेक नव्या विक्रमांच्या उंबरठय़ावर उभा आहे. उद्या सोमवारपासून दिल्लीविरुद्ध सुरू होणारी रणजी लढत वासीमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कारण या लढतीत खेळायला उभा राहणारा वासीम 150 रणजी लढती खेळणारा देशातील पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे. टीम इंडियासाठी 31 कसोटी आणि 2 वन डे लढती खेळणाऱया सलामीवीर वासीम जाफरने गेल्या रणजी हंगामात विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना 1037 धावांचा रतीब टाकला आहे. त्याच्या शानदार खेळामुळेच विदर्भ संघाने सलग दुसऱयांदा रणजी करंडक पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या