‘उजनी’चा पाणीसाठा 60 टक्क्यांवर स्थिरावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे सोलापूर जिह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा 60 टक्क्यांवरच स्थिरावला आहे. गेल्या आठकडाभरापासून पाण्याची हीच स्थिती आहे. पाणीसाठा कमी असल्यामुळे पुढील पावसाळय़ापर्यंत पाण्याचा काटकसरीने कापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी या काळात उजनी धरण 109 टक्के भरले होते.

उजनी धरणात आजअखेर एकूण 96.15 टीएमसी पाणीसाठा असून, पैकी उपयुक्त पाणीसाठा 32.50 टीएमसी एवढाच आहे. धरण क्षेत्रात यंदा एकूण 544 मि.मी. पाऊस झाला असून, धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या अन्य धरणांच्या परिसरात तुलनेने मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने उजनी धरण 60 टक्के भरले. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यातच काढत्या तापमानाचा फटका उजनी धरणातील जेमतेम शिल्लक पाणीसाठय़ाला बसण्याची भीती क्यक्त होत आहे. तापमानवाढीमुळे धरणातील पाण्याचे मोठय़ा प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे.