
‘कौन बनेगा करोडपती?’चा बारावा सीझन सध्या जोरात सुरू आहे आणि त्याला दर्शकांचा चांगला प्रतिसाददेखील लाभत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन या कार्यक्रमाच्या नावाने लोकांना ऑनलाइन गंडा घालण्याचा उद्योगदेखील जोमाने सुरू झाला आहे.
लोकांना फसवण्याचा हा उद्योग पाकिस्तानमधून केला जात असून रौफ नावाचा इसम या सगळ्याच्या मागे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. लोकांना फसवून उकळलेल्या पैशापैकी 70 टक्के पैसे हे हवाला मार्गाने पाकिस्तानला पोचते केले जात आहेत. दिल्ली एनसीआर आणि देशातील इतरही अनेक भागांमधून केबीसी शोच्या नावाने होणाऱया फसवणुकीच्या तक्रारी सध्या मोठय़ा प्रमाणावरती दाखल होत आहेत. यामध्ये लोकांना त्यांच्या मोबाईलवरती अथवा ई-मेलवरती केबीसी कार्यक्रमामध्ये तुमची सीम कार्ड नंबर विजेता म्हणून निवड झाली असून तुम्हाला 25 लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा संदेश पाठवला जातो. तसेच त्याच्या नावाची फाईल बनवल्याचेदेखील कळवले जाते. त्यानंतर विजेत्याला त्याचे नाव, फाईल नंबर इत्यादी कळवून फाईलमध्ये लावण्यासाठी त्याचा पह्टो मागवला जातो.
एकदा का असा पह्टो पाठवला गेला की, काही काळाने तुमची फाईल पूर्ण अपडेट झाली असून विजेती रक्कम खात्यामध्ये पाठवण्यासाठी बँक खात्याचा नंबर व इतर खासगी माहिती मागवली जाते. त्यानंतर इतर चार्जेस व जीएसटी आधी भरावी लागेल, असे सांगत विजेत्याला पंधरा ते पंचवीस हजार रुपये एका खात्यावरती पाठवण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर काही काळाने ज्या नंबरवरून फसवणुकीसाठी पह्न केले गेलेले असतात तो नंबर बंद पडतो आणि खात्यात पैसेदेखील जमा होत नाहीत आणि मग आपण लुबाडले गेल्याची जाणीव झालेले हे ‘विजेते’ पोलिसांकडे धाव घेतात. मात्र आपण जर कधी ‘कौन बनेगा करोडपती?’ या कार्यक्रमाच्या पुठल्याही प्रकारच्या स्पर्धेत कधी भागच घेतलेला नाहीये तर आपण विजेते ठरलो कधी? आणि कसे? हा प्रश्न यापैकी कोणालाच पडत नाही हे विशेष!































































