आठवड्याचे भविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मानसी इनामदार, (ज्योतिषतज्ञ)

मेष – नवे रंग
यशाचे विविध रंग घेऊन येणारा आठवडा असेच वर्णन करावे लागेल. अनेक सुखकारक गोष्टीची चाहूल घेऊन येणारा हा आठवडा आहे. आपल्या इष्ट देवतेचा उपवास अवश्य करा. मनास प्रसन्नता लाभेल. नवीन व्यवसाय उद्योगात गुंतवणूक अवश्य करा. हिरवा रंग परिधान करा.
शुभ परिधान – डोळ्यात काजळ, अत्तर

वृषभ – आनंद सोहळा
कलाकारांच्या हातून आनंददायी कामगिरी घडेल. एखाद्या कलाकृतीचा आनंद घ्याल. घरात छोटासा आनंद सोहळा घडेल. रात्री खूप उशिरापर्यंत बाहेर राहू नका. दीपपूजा करा. पांढरा रंग जवळ बाळगा. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.
शुभ परिधान – धोतर, कुर्ता

मिथुन – आर्थिक लाभ
जोडिदारासमवेत संपूर्ण आठवडा छान जाईल. जोडीने देवीच्या दर्शनाला जा. पिवळा रंग लाभदायक. कामाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. लहान मुलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आहारात सात्विक पदार्थांचा समावेश करा.
शुभ परिधान – टी शर्ट, नासिकालंकार

कर्क – नवी खरेदी
सोमवारी चंद्राचे दर्शन अवश्य घ्या. कामाच्या ठिकाणी फायदा होईल. शिवाय मनःशांती लाभेल. मोतिया रंग आवर्जून धारण करा शिवोपासना करा. नवीन वस्तू घरात येतील. घरातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाने बऱयाच गोष्टी सुलभ होतील.
शुभ परिधान – चष्मा, नेलपेंट

सिंह – सावध राहा
तेजस्विता हा तुमचा स्थायी भाव. प्रसन्नतेची जोड या तेजस्वितेला मिळेल. तपकिरी रंग फलदायी ठरणार आहे. अनपेक्षित लाभ संभवतो. चित्त सावध ठेवा. आसपास घडणाऱया घटनांवर लक्ष ठेवा. घरातील देवीला शेवंतीचे फुल वाहा.
शुभ परिधान – कोल्हापुरी चप्पल, जोडवी

कन्या – महत्त्वाचा निर्णय
नवविवाहित मुलींसाठी हा आठवडा अत्यंत आनंदाचा असणार आहे. लाल रंग परिधान करा. पतीचे प्रेम भरपूर मिळेल. त्याची मर्जी राखा. महत्वाचे निर्णय दोघे मिळून घ्याल. आपल्या त्वचेची काळजी घ्या. जोडिदारासमवेत बाहेर जाण्याचा योग येईल.
शुभ परिधान – पैठणीचे वस्त्र, सुवर्णालंकार

तूळ- भरभराट होईल
बाहेर गावी जाण्याचा योग आहे. पण हातातील कामावर परिणाम होऊ देऊ नका. व्यवसाय उद्योगात भरभराट होईल रामरक्षेचे पठण करा. चंदेरी रंग जवळ बाळगा. घरातील वातावरण चांगले राहील. कामाच्या ठिकाणी नवीन वस्तूंची खरेदी होईल.
शुभ परिधान – नवे वस्त्र.

वृश्चिक – प्रसन्न चित्त
प्रिय व्यक्तीसोबत वेळ मजेत जाईल. घरापासून बरेच दिवस दूर राहाल. पण चित्तवृत्ती प्रसन्न राहतील. शिवोपासना मनःपूर्वक करा. पांढरा रंग महत्वाचा ठरेल. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. थोडीफार पेल्यातील वादळे होतील. पण दुर्लक्ष करा.
शुभ परिधान – केसांना आधुनिक रंग, सनस्क्रीन

धनु – शाकाहार महत्त्वाचा
नव्या ओळखी होतील. त्यातून कामाचा फायदा होईल. सहकाऱयांसोबत जमवून घ्या. चांगली कलाकृती अनुभवाल. त्यातून मनास आनंद मिळेल.. बुधवार तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हिरवा रंग परिधान करा. संपूर्ण शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा. तब्येतीवर चांगला परिणाम होईल..
शुभ परिधान – रंगीत कपडे

मकर – नोकरीची संधी
मनास सतत हुरहूर लागेल. पण आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहा. घरातील शिवलिंगाला बिल्व पत्र वाहा. दुधी रंग यशदायी. प्रगती होईल. सरकारी नोकरीच्या संधी चालून येतील. या आठवडयाच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळेल.
शुभ परिधान – वहाण, हातात कडे

कुंभ – पत्नीप्रेमाला बहर
हातून उत्तम लिखाण घडेल. मनाचे ऐका. प्रसन्न वातावरणात जायचा प्रयत्न करा. उत्तम संगीत कानावर पडेल. पुरस्कार, सन्मान प्राप्त होतील. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने अशक्य गोष्टी साध्य होतात. इष्ट देवतेची पूजा करावी. पत्नीची मर्जी सांभाळा. निळा रंग जवळ ठेवा.
शुभ परिधान – डेनिमचे कपडे

मीन – वेगवान आठवडा
जोडी दर्शवणारी तुमची रास. अत्यंत भावनाप्रधान. हा आठवडा पाण्यासारखा निर्मळ आणि अत्यंत वेगवान असणार आहे. कामातील आव्हानांना तयार राहा. नवीन काम तुमच्यासाठी आणणार आहे. केशरी रंग जवळ बाळगा. मारुतीची उपासना करा.
शुभ परिधान – फेटा, कुर्ता

[email protected]