रंग किंवा पाण्यात स्मार्ट फोन भिजला…तर काय कराल ?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल पाण्यात पडला तर साफ कसा करायचा, हा मोठा प्रश्न असतो. मुख्यत: या फोन्सना रंग लागल्यास ते लवकर निघत नाहीत किंवा ते कसे काढायचे याविषयीही बऱ्याच जणांना माहिती नसते. काही वेळा रंग काढताना आपला फोन खराबही होऊ शकतो. अशा वेळी काय कराल ?

फोनवरील रंग काढण्यासाठी काही जण त्यावर सॅनिटायझर किंवा अल्कोहोल टाकतात किंवा काही जण साबण, डिटर्जंट पावडरचा सुद्धा वापर करतात, अशी चूक कधीही करू नका. यामुळे डिवाइस खराब होऊ शकते.

फोनला लागलेला रंग काढण्याकरिता हँण्ड सॅनिटायझर एका स्वच्छ रुमालाला लावा. त्या रुमालाने मोबाईल हलक्या हाताने साफ करा.

डाग जर जास्त असेल तर रबिंग अल्कोहोलचा वापर करू शकता. फोनचे स्पीकर्स, माइक, चार्जिंग पार्टस आणि हेडफोन जॅक्सला झाकण्यासाठी टेपचा वापर करू शकता. यामुळे रंग मोबाईलच्या आत जाणार नाहीत.

काही वेळा फोन चुकून पाण्यात पडून भिजतो. अशा वेळी सर्वप्रथम फोन स्वीचऑफ करा. नंतर त्यातून सिम कार्ड बाहेर काढा आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने मोबाईल पुसून घ्या. पुसल्यानंतर त्याला उन्हात ठेवा.

अशा वेळी फोन स्वीच ऑफ करून काही तासांकरिता तांदळामध्ये झाकूनही ठेवू शकता. तांदूळ मोबाईलचा ओलसरपणा टिपून घेईल. कमीत कमी पाच मिनिटे स्मार्टफोन सुरू करू नका. त्यानंतर सिम न टाकता फोन सुरू करून बघा. नंतर पुन्हा सिम घालून मोबाईल फोन सुरू करा.