WhatsApp Chat Lock : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर, खासगी चॅट करु शकता लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपने चॅट लॉक करणारे फिचर जोडले आहे. या फिचरच्या मदतीने खासगी चॅट लॉक करता येणार आहेत. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन कोणाच्या हाती लागला तर कोणी ते चॅट वाचू शकणार नाहीत. जाणून घेऊया या फिचरबाबत.

मेटाने व्हॉटअॅपच्या या नवीन फिचरची घोषणा केली आहे. बीटा व्हर्जनवर कंपनी या फिचरला बऱ्याच काळापासून टेस्ट करत होती. आता हे सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. हे फिचर यूजर्सची चॅट सिक्युरिटीसाठी आहे.  व्हॉट्सअॅप चॅट लॉकचे फिचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स कोणत्याही ग्रुप आणि चॅटला लॉक करू शकतात. या फिचरनंतर चॅट फक्त तुम्ही वापरू शकतात. यासाठी डिवाइस पिन किंवा बायोमेट्रिक लॉकचा वापर करावा लागणार आहे.

हे फिचर फिंगर प्रिंट लॉक किंवा फेस लॉकसोबतही काम करतात. जर तुम्हाला कोणता चॅट लॉक करायचा असेल तर WhatsApp त्या संभाषणातील मजकूर चॅट सूचनांमधूनही लपवते. व्हॉट्सअॅपच्या या फिचरचा वापर करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात आधी व्हॉट्सअॅप ओपन करायचे. त्यानंतर एखादा चॅट ओपन करा. वैयक्तिक किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला स्क्रोल करून खाली जावे लागेल. जिथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल. आता तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स व्हेरिफाय करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही चॅट लॉक करू शकता. हे फिचर सर्वांसाठी सुरू करण्यात आले आहे येत्या काही दिवसांत हे फिचर सर्वांसाठी खुले करण्यात येईल. जर तुमच्या व्हॉट्सअॅपवर फीचर दिसत आहे, त्यासाठी अॅप अपडेट करावे लागेल.