
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली आहे. राज्यात आणि देशात त्यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली होती. त्यांच्या साध्या राहणीमुळे जनतेमध्ये ते विशेष लोकप्रिय होते.
2014 साली भाजपची केंद्रात बहुमताने सत्ता आली तेव्हा संरक्षणमंत्रिपदी पर्रिकरांची निवड करण्यात आली होती. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी संसद गाजवली होती. अशाच वेळी ऑगस्टा वेस्टलँड बद्दल चर्चेच्या वेळी काँग्रेसने त्यांच्यावअ टीका केली होती. तेव्हा अस्सल मराठी म्हणीतून त्यांनी काँग्रेसला उडवले होते.
जो अळवाची भाजी खातो त्याच्या गळ्याला खाज येणार अशी म्हण त्यांनी संसदेत म्हटली होती आणि काँग्रेसला गप्प केले होते.






























































