गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी करतात टाळाटाळ, सर्वेक्षणात मिळाली मजेशीर उत्तरं

7

सामना ऑनलाईन । मुंबई

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मूल गृहपाठ करण्यास उत्सुक नाही आणि ते दर वेळी वेगवेगळी कारणे देते, तर असे वाटणारे तुम्ही एकटेच नाहीत. विद्यार्थी आणि गृहपाठ यांच्यातील कडूगोड नातेसंबंध जाणून घेण्यासाठी ब्रेनली, या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाीन पीयर-टू-पीयर लर्निंग कम्यूनिटीने केलेल्या सर्वेक्षणातून समजले की, जवळपास 49% विद्यार्थ्यांनी गृहपाठ करण्यात आपण कधीना कधी टाळाटाळ करीत असल्याचे कबूल केले तसेच ते वेगवेगळी कारणे देत असल्याचेही सांगितले. जेव्हा विद्यार्थ्यांना कारणे देण्याची आवश्यकता निर्माण होते तेव्हा ते ‘गृहपाठ हरवला’ (18.7%0), ‘वैयक्तिक इजा’ (14.6%), अशा कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’(4%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’(13.1%), ‘त्याच्यावर शाई सांडली’ (8.2%) अशी काही मजेशीर करणे देखील देतात.

2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचा आढावा घेणा-या या सर्वेक्षणात वेळेवर गृहपाठ न केल्याच्या विद्यार्थ्यांनी पुढे केलेल्या कारणांबाबत जाणून घेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे यापैकी 69.8% धाडसी विद्यार्थ्यांचा गट म्हणाला की त्यांनी कधीच कारणे दिली नाहीत, तर जवळपास 30% विद्यार्थ्यांनी ते वारंवार सबबी सांगत असल्याचे मान्य केले. कारणे देताना, ती यशस्वी व्हावीत यासाठी विद्यार्थी शक्यतो अस्सल आणि पटणारी असे दोन महत्त्वपूर्ण घटक असलेली सबब शोधत असतात. या कारणांमध्ये ‘गृहपाठ हरवला’, ‘डोकेदुखी’ (14.1%), ‘सांगता न येण्याजोगे कुटुंबात उद्भवलेले संकट’ (9.8%), ‘वैयक्तिक इजा’(14.6%) या सामान्य कारणांसह ‘कुत्र्याने गृहपाठ खाल्ला’(4%), ‘कोणीतरी माझ्या दप्तरातून पळवले’(13.1%), शाई किंवा कॉफी सांडली’ (8.2%),‘लॅपटॉप क्रॅश झाला’(6.1%), ‘दुस-या क्लासच्या वहीत केले’(4.4%),‘माझ्या हातातून वा-याने उडून गेले’(4%),‘आगीत जळून गेले’(3.4%)’ आदी मजेशीर कारणांचा देखील समावेश होता.

या सर्व मजेशीर प्रतिसादांमध्ये 70% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाटते की जर त्यांना पुरेशी ऑनलाइन मदत मिळाली तर ते त्यांचा गृहपाठ वेळेत पूर्ण करतील. त्यामुळे नजिकच्या भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक लाभ मिळण्यासाठी इंटरनेटला एक संसाधनात्मक स्थान बनविण्याची तीव्र आवश्यकता असल्याचे सूचित होते.