भाचीसोबत संबंध ठेवल्यामुळे महिलेने नवऱ्याचे गुप्तांग छाटले

ब्राझीलमधे एका महिलेने तिच्या नवऱ्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी अद्दल घडवली. या महिलेच्या नवऱ्याने तिच्या अल्पवयीन भाचीसोबत अवैध संबंध ठेवले होते. हे कळाल्यानंतर या महिलेने नवऱ्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या महिलेने तिच्या नवऱ्याचे गुप्तांग छाटून टाकले आणि संडासात फेकून दिले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिलेच्या नवऱ्याने तिच्या 15 वर्षीय भाचीसोबत शारिरीक संबंध ठेवले होते. हे सगळे प्रकारण महिलेला कळताच तिला ही बाब सहन झाली नाही. त्यामुळे तिने नवऱ्याला याची शिक्षा देण्याचे ठरवले. आधी तिने नवऱ्याला जवळ बोलावले आणि संधी मिळताच त्याचे हात- पाय बांधून ठेवले. यानंतर वस्तऱ्याने नवऱ्याचे गुप्तांग कापले. ही महिला एवढ्यावरची थांबली नाही. तिने कापलेले गुप्तांग टॉयलेटमध्ये फ्लश केले आणि नंतर नवऱ्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले.

नवऱ्याला शिक्षा दिल्यानंतर महिलेने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली देताना महिलेने सांगितले की भाची आणि नवऱ्याच्या अवैध संबंधांमुळे मी माझ्या नवऱ्याचे गुप्तांग कापून टॉयलेटमध्ये फेकून दिले. आपल्या नवऱ्याला त्याचे गुप्तांग पुन्हा जोडता येऊ नये याची आपण काळजी घेतल्याचं या महिलेने म्हटले आहे.

पोलिसांनी घडलेला प्रकार एकून आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेच्या नवऱ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.