
राजस्थानातील राजसमंद येथे अत्यंत ह्रदय विदारक घटना उघडकीस आली. एका महिलेला दोन्ही मुलीच झाल्या म्हणून सासरच्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला.
चित्तौडमधील बेगू येथे राहणारे राजेंद्र सिंह यांची मुलगी स्वराज कंवर हिचा विवाह 2013 साली भीम गावात राहणारे जितेंद्र सिंह भल्ला यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवस सुखासमाधानात त्यांचा संसार सुरू होता. त्यानंतर या जोडप्याला दोन मुली झाल्या. यामुळे नवरा आणि सासू-सासऱ्यांना सूनेचा राग आला. रागाच्या भरात त्यांनी स्वराज कंवरला बेदम मारहाण केली. हे तिघेही तिचा हुंड्यासाठीही छळ करू लागले. तिला सतत देऊ लागले. सतत चार महिने पीडित महिलेला मारहाण करणे, तिचा छळ करण्याचे प्रकार सुरू होते. नवराही महिलेला सतत मारपीट करत असे. एक दिवस नवरा आणि सासू-सासऱ्यांनी केलेल्या मारझोडीमुळे महिलेचा मृत्यू झाला.
त्यानंतर स्वराज कंवरच्या नातेवाईकांनी पोलीस स्थनकात या प्रकरणाविरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, स्वराजचा नवरा जितेंद्र तिला सारखा दुसरे लग्न करण्याची धमकी देत असे आणि तिच्याकडे हुंड्याची मागणी करत असे. यामुळे स्वराज सारखी आजारी पडत होती. एक दिवस नवऱ्याने दोन्ही मुलींना काही खायला दिले नाही. सासूही तिला मारत असे. यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. त्यावेळी तिला रुग्णालयात दाखल न करता घरीच तिच्यावर उपचार करण्यात आले. स्वराजच्या तब्येतीत सुधारण होत नव्हती. तिची प्रकृती जास्तच खालावत होती. तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान पीडित महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेबाबत सासरच्या व्यक्तिंवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


























































