
गुलाबजाम पाव, दुधातील मॅगी असले चित्रविचित्र पदार्थ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. आता त्यात इडली मिसळची भर पडली आहे. एका महिलेने सोशल मीडियावर इडलीसोबत मिसळचा फोटो शेअर केला आहे. तिच्या या विचीत्र मिश्रणाने युजर्संनी तिला ट्रोल केलेआहे. एका युजरने तर तिला ”आमच्या देशातून चालती हो” असे म्हंटले आहे.
Idli hits better with Misal. Ngl. pic.twitter.com/dARGtEGYvo
— Aditi. (@Sassy_Soul_) April 19, 2023
खाण्याच्या बाबतीत प्रत्येकाची चव वेगवेगळी असते.काही लोकांना केचपसोबत मॅगी खायला आवडते आणि इतरांना ती अगदी साधी आवडते. अदिती नावाच्या या महिलेने तिच्या ताटातील इडलीचे दोन तुकडे, एक वाटी मिसळ आणि लिंबाचा फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करताना तिने लिहीलेय, मी खरं बोलतेय इडलीसोबत मिसळ भन्नाट अनुभव… अशी फोटोओळ लिहीली आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला मिसळ सोबत इडली खाल्ल्याबद्दल ट्रोल केले आहे. तिची ही पोस्ट पाहून एका युजरने ”आमच्या देशातून चालती हो असे म्हंटले आहे”. तर अन्य एका युजरने ”हा इडलीचा अपमान” असल्याचे लिहीले आहे.


























































