
आजच्या एकविसाव्या शतकातही महिलांचा वेशभूषा, मासिक पाळी यांसारख्या कारणांवरून छळ केला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे महत्त्वपूर्ण मत वांद्रे कुटुंब न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. वडाळा येथील 44 वर्षीय रहिवाशाने त्याची पत्नी मनमानी वागते तसेच दैनंदिन जीवनात सहकार्याची भावना ठेवून वागत नाही, असा दावा करीत पत्नीपासून घटस्पह्ट मागितला होता. तथापि, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावत महिलेला दिलासा दिला.
कुटुंब न्यायालयाचे न्यायाधीश ए.एच. लद्धाड यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. आपण 21व्या शतकात आहोत. मात्र अजूनही महिलांचा मासिक पाळी आणि त्यांची वेशभूषा अशा विविध मुद्दय़ांवर छळ केला जात आहे. पुरुष मंडळी आजच्या जमान्यातही महिलांच्या पेहरावावर आपले नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिलांच्या स्वातंत्र्यावर तसेच त्यांच्या स्वतःच्या आवडीनिवडीवर आपली हुकूमत गाजविण्याचा प्रयत्न केला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी निरीक्षणे न्यायाधीश लद्दड यांनी निकालपत्रात नोंदवली आहेत. या प्रकरणातील दाम्पत्याचे मार्च 2015मध्ये लग्न झाले होते. लग्न होऊन काही दिवस उलटत नाही तोच या दाम्पत्यामध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. लग्नाच्या चार महिन्यांनंतर पत्नीने घरातील कामांवरून वारंवार होणाऱया भांडणाला पंटाळून सासरचे घर सोडले. त्यानंतर सप्टेंबर 2016मध्ये पतीने घटस्पह्टासाठी काwटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नी संसारात सहकार्याची भावना ठेवून वागत नाही तसेच कुटुंबासमोर अपमान केला, असा दावा याचिकेत केला होता. मात्र सर्व वस्तुस्थिती विचारात घेत कुटुंब न्यायालयाने पतीने घटस्पह्ट मिळवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावली.
महिलेने केलेले आरोप
पतीच्या याचिकेवर आक्षेप घेताना महिलेने अनेक आरोपांचा पाढा वाचला होता. सासरच्या घरी फक्त साडी घालण्याची सक्ती करण्यात आली होती. पंजाबी ड्रेस किंवा नाईट ड्रेस यांसारखे इतर प्रकारचे कपडे घालण्यास परवानगी दिली जात नव्हती. तसेच मासिक पाळीच्या काळात माहेरी जाण्यास सांगितले. त्या वेळी माहेरी गेली नाही म्हणून घराच्या कोपऱयात बसण्यास भाग पाडले. तसेच घरातील कुठल्याही वस्तूला हात न लावण्याची व ओले कपडे घालण्याची जबरदस्ती केली. तिच्या आरोपांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली.
न्यायालय काय म्हणाले…
- प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे. जोडीदाराने काय परिधान करावे आणि काय करू नये याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.
- महिलेच्या नणंद आणि सासूला त्यांच्या मर्जीनुसार वेशभूषा परिधान करण्यास मुभा दिली जाते. मात्र महिलेच्या वेशभूषेवर बंधन घातले जाते हे अत्यंत दुर्दैवी आहे.




























































