
सामना ऑनलाईन, इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी मंत्री हारून सुल्तान यांनी महिलांच्या मतदानावर वादग्रस्त वक्त्यव्य केले आहे. महिलांनी मतदान करणे हे हराम असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत पंजाब प्रांतात हारून सामाजिक कल्याण मंत्री म्हणून कार्यरत होते. देशात २५ जुलै रोजी होणार्या लोकसभा निवडणूकीसाठी ते पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाज (पीएमएल-एन) या पक्षाकडून ते उभे आहेत. एनए-१८४ या मतदारसंघातून त्यांचा सामना पाकिस्तान ए तहरिक-ए-इंसाफच्या महिला उमेदवार जहरा बासित सुल्तान बुखारी यांच्याशी आहे, योगागाने त्या त्यांच्या वहिनी आहेत.
पाकिस्तानच्या द न्युज या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एका रॅलीला हारुन सुल्तान संबोधित करताना म्हणाले की “आम्ही अल्लाहाने सांगितलेल्या मार्गाने जाऊ आणि महिलांनी मतदान करणे हराम आहे त्यावर आपण बंदी आणू.” पाकिस्तानमध्ये संविधानाने सर्व लोकांना मतदानाचा हक्क दिला आहे, परंतु धर्मिक परंपरेच्या नावाने लाखो महिलांना या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे.




























































