
कोरोनामुळे अनेक कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्विकारावा लागला आहे. परंतु या पर्यायामुळे मुंबई ठाणे उपनगरात इंटरनेट स्लो झाले आहेत. इंटरनेट सेवा पुरवणार्यांकडे ग्राहकांच्या तशा तक्रारी येत आहेत.
केबल नंतर प्रत्येक घरात इंटरनेट सेवा सामान्य झाली आहे. केबल ऐवजी स्मार्ट टीव्हीवर आपल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यात कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी घरून आपले काम करत आहेत. पण एकाचवेळी अनेक लोक इंटरनेट वापरत असल्याने इंटरनेट सेवांवर ताण येत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई ठाण्यातील शहर, उपनगरांत ग्राहकांनी स्लो इंटरनेटच्या तक्रारी केली आहे. इंटरनेट सेवा पुरवणार्या ऑपरेटर्सने दिलेल्य माहितीनुसार एकाच वेळी अनेक लोक इंटरनेट वापरल्यामुळे इंटरनेट स्लो झाले आहे. त्यामुळे आता सर्व्हर वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही ऑपरेटर्सनी ब्रॉडबॅण्ड वाढवल्यामुळे फार तक्रारी येत नसल्याचे सांगितले आहे.
वर्क फ्रॉम होममुळ एकाच वेळी घरातील टीव्ही, कॉम्प्युटर/लॅपटॉप आणि सर्व फोन्समध्ये इंटरनेटचा वापर होतो. जेव्हा कर्मचारी बाहेर असतात तेव्हा फक्त काही मोबाईल्स आणि टीव्ही इंटरनेटवर असतात. परंतु गेल्या काही दिवसांत कर्मचारी घरी असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. ज्यांच्याकडे 10 MBPS 20 MBPS तसेच त्यापेक्षा कमी स्पीड असलेल्या ग्राहकांना ही समस्या भेडसावत आहे. ज्यांच्याकडे 100 MBPS इंटरनेट आहे त्यांना ही समस्या येत नाही. यावर अनेकांनी आपले मोबाईल डेटा वापरून काम करण्याचा प्रयत्न केला आहे.





























































