इथे ऑफिस भाड्याने मिळेल! ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कार्यालयीन जागेला मागणी कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीने लोकांच्या जीवनशैलीत बरेच बदल झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे सध्या ‘वर्प फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले जात आहे. त्याचा फटका कर्मचाऱयांबरोबरच ऑफिसच्या जागा भाडय़ाने देणार्यांनाही बसला आहे. देशातील सात महत्वाच्या शहरांमधील ऑफिसच्या जागांची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 44 टक्क्कयांनी घसरली आहे.

जेएलएल इंडिया या रियल इस्टेट सर्विस देणाऱया कंपनीच्या अहवालानुसार, कार्यालयीन जागांची मागणी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.582 कोटी स्वेअर फूटने घसरली आहे. अनेक काऍर्पेरेट कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयीन विस्ताराच्या योजना तूर्तास गुंडाळल्या आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱयांना घरूनच काम करण्यास सांगितले असल्याने ऑफिसच्या जागांची मागणी कमी झाली आहे.

यासंदर्भात जेएलएल इंडियाचे सीईओ रमेश नायर म्हणाले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ऑफिसच्या जागांसाठीची मागणी 44 टक्क्यांनी घसरली. मात्र त्याचवेळी 2016 ते 2018 दरम्यान ऑफिससाठीच्या जागांच्या मागणीचा विचार केला तर मार्पेटचे चढउतार समजून येतील. कोरोना काळामध्ये सर्वच कंपन्यांनी वर्प फ्रॉम होमचे धोरण स्वीकारले. त्यामुळेच ऑफिस कल्चर बदलले. यामुळे कार्यालयीन जागांची मागणी मंदावली, असल्याचे नायर यांनी सांगितले.

  • 2019 मध्ये सरासरी 4.65 कोटी स्वेअर फूट जागा ही हिंदुस्थानातील दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरु या सात प्रमुख शहरांमध्ये काॅर्पेरेट कंपन्यांनी भाडय़ाने घेतली होती. मात्र लॉकडाउनमुळे यात मोठी घसरण झाली.
  • जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 54.3 लाख स्वेअर फूट जागा या काॅर्पेरेट कंपन्यांनी भाडेतत्वावर घेतल्या. अनलॉकच्या टप्प्यात जागांची मागणी पुन्हा वाढली. या तिमाहीत 82.7 लाख स्वेअर फूट जागा भाडेतत्वावर देण्यात आली.
  • जानेवारी ते मार्च 2020 दरम्यान कार्यालयीन जागांची मागणी ही 80 लाख स्वेअर फूट इतकी होती. जी पुढील तिमाहीमध्ये 33.2 लाख स्वेअर फूटांपर्यंत घसरली.