
सामना प्रतिनिधी । मुंबई
कंपनीचे गोदाम नोकरानेच साफ केल्याची घटना गॅण्टरोड येथे घडली. सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्डडिस्क असा तब्बल आठ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल नोकराने चोरून नेला. उमेश मेहता यांच्या कंपनीचे ग्रॅण्टरोड येथे गोदाम आहे. मेहता यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने १२ ते १८ जूनच्या दरम्यान गोदामातील विविध कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि हार्डडिस्क चोरून नेल्या. हा प्रकार लक्षात येताच महेता यांनी डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्यात नोकराविरोधात चोरीची तक्रार दिली.




























































