‘हे’ आहे जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक विमान, टॉप स्पीड जाणून व्हाल हैराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आतापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक कार-स्कूटर बद्दल बऱ्याचदा ऐकलं असले. मात्र आज आम्ही तुम्हाला एका इलेक्ट्रिक विमानाबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही आतापर्यंत या विमानाबद्दल ऐकलं नसेल, तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे विमान एका प्रीमियम कार उत्पादक कंपनीने बनवले आहे. अलीकडेच या विमानाने आकाशात उड्डाण करताना 555.9 किमीचा प्रवास पूर्ण केला आहे.

स्पिरिट ऑफ इनोव्हेशन

Rolls-Royce sets world speed record with revolutionary £6m aircraft | Science | News | Express.co.uk

प्रीमियम लक्झरी कार उत्पादक कंपनी ‘रॉल्स रॉयस’ने हे विमान तयार केलं आहे. कंपनीने याच नाव ‘स्पिरिट ऑफ इनोव्हेशन’ असं ठेवलं आहे. कंपनीने नुकतेच या विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण पूर्ण केले आहे. या उड्डाणा दरम्यान हे विमान 15 मिनिटे आकाशात होते. या विमानाच्या यशस्वी उड्डाणानंतर भविष्यात आकाशात इलेक्ट्रिक विमानाचे राज्य असेल, अशी अशा कंपनीने व्यक्त केली आहे.

बॅटरी

Rolls-Royce's Electric Plane Claimed To Be The 'Fastest' Of Its Kind In The World | Tech Times

रॉल्स रॉयसने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे हे पहिले विमान सिंगल सीटर आहे. ज्यात कोणत्याही इतर विमानाच्या तुलनेत सर्वात पॉवरफुल्ल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने यात 6000 सेल बॅटरी पॅक दिला आहे.

एअर टॅक्सी करणार डेव्हलप

Rolls-Royce Claims to Have Developed World's Fastest Electric Aircraft — Take a Look | Travel + Leisure

रॉल्स रॉयसने एअर टॅक्सी डेव्हलप करण्यासाठी ‘टेकनम’ नावाच्या एका कंपनीसोबत भागीदारी केली आहे. Rolls-Royce आणि Airframe Tecnum स्कॅन्डिनेव्हियाच्या सर्वात मोठ्या एअरलाइन Widerøe सोबत मिळून काम करत आहेत. जेणेकरुन सर्व-इलेक्ट्रिक विमानाचे बाजारात वितरण करता येईल. यासोबतच कंपनीने 2026 पर्यंत revenue सेवेसाठी इलेक्ट्रिक विमाने तयार करण्याची योजना देखील आखात आहे.