जागतिक मराठी संमेलन नागपुरात आजपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित 16 व्या जागतिक मराठी संमेलनाला आज शुक्रवार, 4 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवरील संमेलनाचे उद्घाटन दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अमेरिकास्थित मराठी उद्योजक डॉ. श्रीनिवास ठाणेदार संमेलनाचे अध्यक्ष आहेत. उद्घाटनानंतर रामदास फुटाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत. 4 ते 6 जानेवारी असे तीन दिवस हे संमेलन चालणार आहे.