जागतिक ओझोन दिवस..

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी १६ सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया..
ओझोन म्हणजे काय?- आपल्या पृथ्वीभवती अनेक वायूंच्या थरांचे वातावरण बनलेले आहे. त्यामध्ये ओझोन हा सर्वात महत्वाचा थर आहे. हा ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले रक्षण करतो. ही अति नील किरणे जर थेट आपल्या त्वचेच्या संपर्कात आली तर आपल्याला त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हा ओझोनचा थर हा अतिनील किरणांचा प्रभाव कमी करतो. त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यास मदत होते. किंबहुना असेही म्हणता येईल की आपल्या पृथ्वीवरील जीवसृष्टी ओझोनमुळेच तयार झाली आहे. सध्या जागतिक उष्णतेच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याने पृथ्वीवरील वातावरण तप्त होत चालले आहे. या उष्णतेचा आपल्या पर्यावरणावर आणि थेट परिणाम ओझोनच्या थरावर होत आहे. यामुळे शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीच्या वातावरणात असलेल्या ओझोनच्या थराला छिद्र पडले आहे. त्यामुळे सूर्याची हानिकारक किरणे थेट आपल्यावर पडत आहेत, पृथ्वीवर पडत आहेत. यातूनच असह्य उकाडा.. वारंवार उद्भवणारी पूरपरिस्थिती.. या पार्श्वभूमीवर दरवर्षी १६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९४ पासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली.
ओझोनचे छिद्र आणि विज्ञान – ओझोन हा ऑक्सिजनचा विशेष प्रकार आहे. याचे वैज्ञानिक नाव ओ ३ आहे. हा आपल्या वातावरणाचा एक अतिशय छोटा भाग आहे. पण तरीही त्याची उपस्थिती अत्यंत महत्वाची आहे. हा ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० ते ४० किलोमीटरच्या उंचीवर असतो. या भागाला समताप मंडल म्हणतात.
चांगला ओझोन, वाईट ओझोन – समताप मंडलात ओझोन सूर्याची हानिकारक किरणे शोषून घेतो. या ओझोनला चांगला मानले जाते. याउलट पृथ्वीच्या पृष्ठभागावर जादा ओझोन जो प्रदूषणातून तयार होतो तो संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणासाठी हानिकारक ठरतो.


ओझोनचे रक्षण कसे करावे?

१) विविध उत्पादनापासून बाहेर पडलेली विषारी रसायने चांगल्या ओझोनला हानी पोहोचवितात. त्यामुळे नेहमी पर्यावरणपूरक वस्तू खरेदी करा.

2) फ्रीज, एसी ही उपकरणे क्लोरोफ्लूरोकार्बन उत्सर्जित करतात. अशी उत्पादने टाळा.

३) वाहनांमधून निघणाऱ्या धुरांतून प्रदूषण होते. सायकलचा वापर उत्तम ठरतो.