वरळीतील नौदल तळाजवळ उत्तुंग इमारती कशा उभ्या राहिल्या?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

वरळीतील नौदल तळाजवळ उत्तुंग इमारती कशा उभ्या राहिल्या, त्यांना परवानगी कोणत्या आधारावर दिली गेली, याची संपूर्ण माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी नौदलाला दिले.

नौदल तळापासून 500 मीटरपर्यंत उत्तुंग इमारतींचे बांधकाम करता येत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम करण्यात आला आहे. असे असताना वरळीतील नौदल तळाजवळ अनेक उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यांना परवानगी दिली असेल तर अन्य इमारतींच्या पुनर्विकासाला अडथळा करण्याचे कारण काय, याचे स्पष्टीकरण नौदलाने द्यायला हवे, असे न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे.