चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची वुहानला भेट

649

चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी वुहान शहरात डिसेंबरमध्ये उद्भवलेला कोरोना आता आटोक्यात आल्याने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी प्रथमच वुहानला भेट दिली. कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात आला असून एकत्रितपणे कोरानाशी लढा देऊन विजय मिळवू, असा विश्वास शी जिनपिंग यांनी व्यक्त केला.

शी जिनपिंग यांनी मास्क परिधान करून लष्करी आणि आरोग्य अधिकाऱयांसह वुहानमधील रुग्णालयांना भेटी दिल्या. हुबेई प्रांतातील कोरोनाला आता प्रतिबंध आला असल्याचे जिनपिंग म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या