
प्रसाद नायगावकर, यवतमाळ
घाटंजी तालुक्यातील घोटी येथील युगनिर्माण आश्रम शाळेतील 25 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. जेवण केल्यावर लगेच 25 विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, ताप अस्वस्थ वाटू लागले. त्यांना घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी घटनेची गंभीरता बघता तत्काळ उपचार सुरु केलेत. त्यातील 12 विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जेवण किंवा अतिउन्हामुळे हा त्रास झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय ठमके यांनी सांगितले आहे.



























































