मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासलं काळं; शासन आपल्या दारी कार्यक्रमाआधीची घटना, प्रशासन अॅलर्ट मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-eknath-shinde-black-ink

यवतमाळ येथे ट्रिपल इंजिन मिंधे सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तान शहरभर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र काही अज्ञातांनी पोस्टरला काळं फासलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह पोस्टरवरील अन्य राजकीय मंडळींचे चेहरे देखील काळे करण्यात आले आहेत.

‘शासन आपल्या दारी’ या पोस्टरला काळं फासल्यानंतर त्याचे फोटो व्हायरल झाले. अखेर नगर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेत पोस्टर काढून टाकले. पोस्टरवर काळं कुणी फासलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता पोलिसांनी देखील दक्षता म्हणून जागोजागी बंदोबस्त वाढवला आहे. कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन आता अधिक काळजी घेत आहे. कार्यक्रम स्थळासह शहरात सगळीकडेच बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे.