
येस बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले डीएचएफएल पंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि त्यांचा भाऊ धीरज वाधवान यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी आरोपींचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला. त्यामुळे वाधवान बंधूंचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढणार आहे.
सीबीआय आणि ईडीच्या म्हणण्यानुसार येस बँकेने एप्रिल ते जून 2018 दरम्यान डीएचएफएल मध्ये 3700 कोटी रुपये गुंतवले असून येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना 600 कोटी त्यातून मिळाले व राणा कपूर यांनी हे पैसे आपल्या मुलींच्या नावे असलेल्या पंपनीत गुंतवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या वाधवान यांनी हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. अॅड. अमित देसाई यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की सीबीआयने दिलेल्या मुदतीत चौकशी अहवाल कोर्टात सादर केलेला नाही. कोर्टाने याची दखल घेऊन आरोपीना जामीन द्यावा. त्यावर सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल पुंभकोणी यांनी बाजू मांडत जामीन अर्जाला जोरदार विरोध केला. ते म्हणाले की, आरोपपत्र दाखल करण्यास उशीर झाला. कोरोनामुळे लॉकडाऊन देशभरात सुरू होते त्यामुळे कागदपत्रे हाताळता आली नाहीत हायकोर्टाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.





















































