
निवडणूक प्रचारात भाजपने अखेर ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा आणला आहे. लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा आणला जाईल. आताच सुधारा, नाहीतर ‘राम नाम सत्य… असा इशारा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.
उत्तरप्रदेशात आठ विधानसभा जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. जौनपुर आणि देवरिया येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. यावर योगी आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलणार असल्याचे सांगितले. उत्तरप्रदेश सरकार लव्ह जिल्हादविरोधात कायदा तयार करणार आहे. जे लोक आपली ओळख लपवतात आणि आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात त्यांनी सुधारले पाहिजे. जर तुम्ही सुधारला नाहीत तर ‘राम नाम सत्य’ची यात्रा आता निघणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी आम्ही ऑपरेशन शक्ती राबविणार आहोत असे त्यांनी सांगितले.





















































