तुमचा अली तर आमचा बजरंगबली; योगी अदित्यनाथांचा कमलनाथांवर पलटवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशात एका सभेत बोलताना काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर हल्ला चढवला. काँग्रेसला फक्त मुस्लिमांच्या मतांची गरज आहे, असे वक्तव्य कमलनाथ यांनी केल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. त्यांच्या या विधानाचाही योगी यांनी समाचार घेतला. ‘कमलनाथजी तुम्हांला तुमचा अली मुबारक असो, आमच्यासाठी बजरंगबली पुरेसे आहेत.’ अशा शब्दांत योगी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्ला चढवला.

कमलनाथ यांचा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. आपल्याला एससी एसटी मते नकोत, एससी-एसटी मते भाजपलाही मिळतात. आपल्याला मुस्लिमांची 90 टक्के मते हवी आहेत. मुस्लिम हे काँग्रेसची व्होटबँक आहे, असे कमलनाथ या व्हिडिओत बोलत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसवर टीका होत होती. त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.