योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल, यूपी एटीएसची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली आहे. 112 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्यात आला.

फोन करणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्याची ओळख रिहान म्हणून करण्यात आली आहे आणि यूपीच्या दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) सतर्क करण्यात आले आहे.

फोन कॉल व्यतिरिक्त, कॉलरने यूपी पोलिसांच्या सोशल मीडिया डेस्कवर मजकूर देखील पाठवला.

फोन करणाऱ्याच्या डीपीवर अल्लाह शब्द असलेला फोटो होता.

‘सीएम योगींना लवकरच मारणार’, असा संदेश आल्याची राज्य पोलिसांनी माहिती दिली.

112 हा उत्तर प्रदेश सरकारने आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना कॉल करण्यासाठी जारी केलेला टोल-फ्री नंबर आहे.