यूट्यूब बंद करणार Dislike Button, जाणून घ्या काय आहे कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या व्हिडीओला किती लोकांनी पसंत आणि नापसंत केलं आहे, हे यूट्यूब वरील लाईक आणि डिसलाईक बटनमुळे कळते. यात लाईक आणि डिसलाईकची संख्या देखील युजर्सला दिसते. मात्र आता यूट्यूब या फीचरमध्ये मोठा बदल करणार असल्याचे समजते आहे. आता युजर्सला लाईक आणि डिसलाईक हे बटन दिसणार, पण किती लोकांनी व्हिडीओला डिसलाईक केलं आहे, हे त्यांना कळू शकणार नाही. मागील काही काळापासून व्हिडीओ क्रिएटरद्वारे या फीचरसाठी मागणी केली जात होती. आता युट्युबने त्यांची ही मागणी मान्य केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, जे युजर्स एखाद्या व्हिडीओ क्रिएटरला टार्गेट करत आहेत, त्याचा या बदलामुळे बचाव करता येईल.

या कारणामुळे युट्युबने उचलेल हे पाऊल

अभिनेता किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीविरुद्ध काही युजर्स आपल्या वैयक्तिक सूडबुद्धीतून युट्युबचा अनेकदा गैरवापर करतात. मोठ्या संख्येने लोक अशा लोकांच्या व्हिडीओंवर जाणूनबुजून डिसलाईक बटण दाबतात. कधीकधी अशा लोकांचा उद्देश फक्त डिसलाईकची संख्या वाढवणे हा असतो. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूडला लक्ष्य करण्यात आलं होत. त्यानंतर काही युजर्सनी जाणूनबुजून सलमान खान आणि करण जोहरच्या चित्रपटातील गाण्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हिडीओंवरील डिसलाईक बटण दाबले होते.

अशा परिस्थितीनंतर यूट्यूबला आपल्या काही फीचर्समध्ये बदल करावे लागले आहेत. हे अपडेट आता सुरू झाले असून बर्‍याच व्हिडीओवर आता अनेक युजर्सला डिसलाईकची संख्या दिसणे बंद झाले आहे. युट्युबने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले होते की, अनेकवेळा नवीन युट्युब व्हिडीओ क्रियेटरला लक्ष केलं जात. नवीन क्रिएटरची ऑनलाइन छळवणूक थांबण्यासाठी युट्युबमधे काही बदल करण्यात येणार आहे.