यूटय़ूबचा नेक्स्ट अप क्लास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूटय़ूबने 2022 या वर्षासाठी नेक्स्ट अप क्लास लाँच करण्याची घोषणा केली आहे. यूटय़ूब क्रिएटर्सच्या पॅशनचे बिझनेसमध्ये रूपांतर करण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे. देशभरातील 20 कंटेट क्रिएटर्स यात सहभागी होणार आहेत, जे हिंदी, मराठी, बंगाली, तमीळ, कन्नड आदी भाषांमध्ये आर्ट अॅण्ड क्राफ्ट, एंटरटेनमेंट, फॅशन आणि ब्युटी अशा विविध विषयांवर कंटेट तयार करतात.